Ads Here

Thursday, February 25, 2021

चुलीवरची खीर एकदा | Chulivarachi Kheer Ekada

चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफुटून बसली
काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना
झार्‍यानं टोचलं, डेगीतलीला पुसलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला चटली

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल
मन आले भरू, डोळे लागले झरू
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली

खीर थंड झाली, वाटीत बसून आली
लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली
“पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझं म्हणणे ऐक गडे”.. पण अं हं..
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली

तिकडून ताई आली, तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली
तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली
कढईतली पुरी मग कध्धी नाही रुसली


गीतप्रज्ञा खांडेकर
गीत प्रकारबालगीत

No comments:

Post a Comment