Ads Here

Thursday, February 25, 2021

चुकवित लाख डोळे | Chukavit Lakh Dole

चुकवित लाख डोळे चोरूनिया निघाले
जागेपणी तुझ्या मी स्वप्‍नात आज आले

घडणार जे उद्याला ते आज पाहते मी
लावीन हात तेथे आनंद निर्मिते मी
पात्री रितेपणाच्या भरिते सुरम्य झेले

माझ्याविना न येथे छाया दुजा कुणाची
जाणीव गुंजते रे उरि आपलेपणाची
माझ्यातुझ्या घराची मी मालकीण झाले

गृहिणीपदासवे ये संजीवनी करी या
संसार थाटला मी स्वप्‍नातल्या घरी या
मौनी मनोगताचे संगीत आज झाले


गीतआशा भोसले
चित्रपटगुरुकिल्ली
गीत प्रकारचित्रगीत, नयनांच्या कोंदणी

No comments:

Post a Comment