Ads Here

Thursday, February 25, 2021

छुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी | Chunnuk Chunnuk Taal

छुन्‍नुक छुन्‍नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी
रानपांखरांसंगं गातो तुझी विठ्ठला गाणी

मोत्यांच्या कणसात डोलते तुझे देखणे रूप
निळंसावळं धुकं भोवती कुणी फिरविला धूप
ही भक्तीची फुलं उमलली विठू तुझ्या चरणी

पंख उभारून ऊस उभा हा मोर जसा डोलतो
मुळा नि कांदा कोथिंबिरीतून विठू बघा नाचतो
घाम गाळिता रोप सुखावे विठू तुझी करणी

मातीमधला अबीरबुक्का रोज लावितो भाळी
तुझं नाव मी घेता देवा पान वाजवी टाळी
विठ्ठल अवघा झाला मळा, ओठी अभंगवाणी


गीतश्रीकांत पारगांवकर
चित्रपटफुकट चंबू बाबुराव
गीत प्रकारभक्तीगीत, चित्रगीत

No comments:

Post a Comment