Ads Here

Thursday, February 25, 2021

चित्र जयाचे मनी रेखिले | Chitra Jayache Mani Rekhile

चित्र जयाचे मनी रेखिले
शिवशंकर ते आज पाहिले

ध्यानमयी ते रूप मनोहर
वदनावरचे तेज शुभंकर
स्वप्‍नच माझे सगुणरुपाने जणू मूर्त जाहले

समीप येता अधीर पाउली
अमृतात ही काया न्हाली
तनूमनाचे भान प्रियाच्या चरणांवर वाहिले

आता दुजेपण कुठे राहिले?
अवघे जीवन शिवमय झाले
या देहाचे बंध तोडुनी अनंतास पर्णिले


गीतमाणिक वर्मा
रागकाफी
गीत प्रकारभावगीत, कल्‍पनेचा कुंचला, मना तुझे मनोगत

No comments:

Post a Comment