Ads Here

Thursday, February 25, 2021

चिंब भिजलेले रूप सजलेले | Chimb Bhijalele

या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले
सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्‍नांचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल-छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे


गीतशंकर महादेवन, प्रीती कामत-तेलंग
चित्रपटबंध प्रेमाचे
गीत प्रकारचित्रगीत, ऋतू बरवा, युगुलगीत

No comments:

Post a Comment