Ads Here

Thursday, February 25, 2021

चिंब पावसानं रान झालं | Chimb Pavasane Raan Jhale

चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी.

झाकू नको कमळनबाई एकान्‍ताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी.

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी.

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी


गीतलता मंगेशकर, सुरेश वाडकर
चित्रपटसर्जा
गीत प्रकारचित्रगीत, ऋतू बरवा, युगुलगीत

No comments:

Post a Comment