Ads Here

Thursday, February 25, 2021

चिमण्या पांखरांचे चिमणे ग | Chimanya Pakharanche

चिमण्या पांखरांचे चिमणे ग घरकुल
चिमणे पंख मऊ चिमणी ग किलबिल !

कालच्या वादळाची नाही ग आठवण
उद्याची नाही चिंता नाही ग साठवण
हालत्या फांदीवरी डोलती वंशवेल !

आभाळ वर निळे विशाल खाली जग
झाडांच्या मनोर्‍यांत चिमणे लोभ-राग
प्रहार करू जाता वाराही थरारेल !

पाखरं आभाळाची, आधार धरणीचा
देखावा मनोहर देवाच्या करणीचा
वेगाने धावताना काळ उडुनि जाईल !


गीतआशा भोसले
चित्रपटचिमणी पाखरं
गीत प्रकारचित्रगीत

No comments:

Post a Comment