Ads Here

Thursday, February 25, 2021

छत आकाशाचे आपुल्या | Chat Aakashache Aapulya

छत आकाशाचे आपुल्या घराला सखये
तृणांकुरांची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये

गळ्यात घालुनी गळे सखये मिळुनी ही धुंद करू उपवनें
सुरांत मिसळून सूर उलगडू दोन जिवांची मने
स्वैर मोकळे पिसाट जगूया भिरकावुनी दुनियेला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये

साहु कशी विजने प्रियतमे जाऊ नको परदेसी
तुझ्यावाचुनी मोडून घरटे होईन मी वनवासी
पंख नभाचे लावून उडूया सोडून या धरतीला
या शापित आयुष्याला
छत आकाशाचे आपुल्या घराला सखये


गीतअजितकुमार कडकडे
नाटककधीतरी कुठेतरी
गीत प्रकारनमन नटवरा

No comments:

Post a Comment