Ads Here

Thursday, February 25, 2021

चार होत्या पक्षिणी त्या | Char Hotya Pakshini Tya

चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले


गीतफैयाज
नाटकवीज म्हणाली धरतीला
गीत प्रकारनमन नटवरा

No comments:

Post a Comment