Ads Here

Thursday, February 25, 2021

बाळ गुणी तू कर अंगाई | Baal Guni Tu Kar Angai

बाळ गुणी तू कर अंगाई
जोजविते रे तुजला आई !

तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना

झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई

निजले तारे निजले वारे
शांत झोपली रानपाखरे

जग भवतीचे निजले सारे
चंद्रहि करितो गाई गाई

मंद पाउली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी

अजुनी मिटेना कशी पापणी?
नीज लडिवाळा नीज लवलाही


गीतसुधीर फडके, सुमन कल्याणपूर
चित्रपटभाग्यलक्ष्मी
गीत प्रकारचित्रगीत

No comments:

Post a Comment