Ads Here

Thursday, February 25, 2021

चिन्मया सकल हृदया | Chinmaya Sakal Hridaya

चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा
वर वरदा, कलिमलविलया ॥

विषय पिपासापीडितसा, नि:सारा, संसारा
मृगनीरासम भुललों मी परि फसलों
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥

कामधनाशा ही विवशा, मन्‍नाशा
सरसावे, तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी
यांतुनी सोडवुनी मज घ्याया ॥

सौख्य सदा नव ज्या ठायीं, तापाचा,
पापाचा लेश नसे, शांति वसे, ने येवोनी
त्या स्थानी, सुखभुवनीं दासा या ॥


गीतआनंद भाटे
चित्रपटबालगंधर्व
गीत प्रकारचित्रगीत
  टीप
• ‘संगीत संशय्कल्लोळ’ नाटकातील पदाचे संगीत- गो. ब. देवल (ध्वनीफित अनुपलब्ध.)

No comments:

Post a Comment