Ads Here

Thursday, February 25, 2021

चिंचा आल्यात पाडाला | Chincha Aalyat Padala

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला-
माझ्या झाडाला !

माझ्या कवांच आलंय्‌ ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय्‌ पाणी
काय बघतोस राहुन आडाला?

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वरखाली
फळ आंबुस येईल गोडाला !

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला?


गीतआशा भोसले
चित्रपटजशास तसे
गीत प्रकारचित्रगीत, लावणी

No comments:

Post a Comment